विधान भवनात पत्रकारांची बाजू मांडणारः नाना पटोले

बारामती, 7 जानेवारीः विधान भवनात पत्रकारांची बाजू मांडणार असून त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते बारामती येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

पत्रकार दिनानिमित्त बारामतीमधील कसबा येथील डेंगळे गार्डन येथे संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष योगेश नालंदे, मन्सूर शेख, चेतन शिंदे तसेच संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने 5 जानेवारी 2022 रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कठडा तोडून गाडी पडली नीरा नदीत!

या प्रसंगी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट, आमदार रामहरी रुपनवर, काँगेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, उद्योजक कौशल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, पत्रकारांचा न्याय हक्कासाठी मी विधान सभेत पत्रकारांची बाजू मांडणार आहे. पेपरच्या कागदाचे दर वाढले आहेत, त्याचा जीएसटी कमी करणार, शासकीय जाहिराती सरसकट पत्रकारांना लागू करणार, पत्रकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राखीव कोटा करण्यात यावा, पत्रकार बांधवांसाठी हॉस्पिटलमध्ये जर एखादा वाईट प्रसंग वाढवला तर त्यासाठी एखादी तरतुद करणार तसेच पत्रकारांना विमा संरक्षण मिळण्याची तरतूद करणार, पत्रकार संरक्षण कायदा मजबूत करणार असे अनेक मुद्दे विधान भवनात मांडणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी बनविल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू

आयोजित कार्यक्रमांमध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आदर्श पत्रकारिता पुरस्कार तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्रधान करण्यात आला होता. या मध्ये पत्रकार बांधवांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन नाना पटोले यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला बारामती, दौंड ,इंदापूर, पुरंदर तसेच फलटण तालुक्यातील दैनिक, साप्ताहिक तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविका योगेश नालंदे यांनी केली तर आभार नाना साळवे यांनी मानले.

2 Comments on “विधान भवनात पत्रकारांची बाजू मांडणारः नाना पटोले”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *