नामदेव जाधवांच्या तोंडाला काळे फासले

पुणे, 18 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) लेखक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली आहे. नामदेव जाधव हे पुणे शहरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे. तर या घटनेची जबाबदारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने स्वीकारली आहे.

3 डिसेंबरला राजस्थानमधून काँग्रेस हद्दपार होणार – नरेंद्र मोदी

नामदेव जाधव हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी संतप्त झालेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले. त्यावेळी पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव केला आणि त्यांना बाजूला नेले. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेबद्दल पुणे शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही नामदेवराव जाधव यांना काळे फासले आहे. केवळ प्रसिद्धीसाठी किंवा सुपारी घेऊन कोणत्याही पुराव्याशिवाय आदरणीय पवार साहेबांची बदनामी करणाऱ्या माणसांचा यापुढे पुण्यात असाच पाहुणचार केला जाईल.” असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

धनगर समाजाच्या वतीने आज इंदापूर बंद

दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचे बनावट जात प्रमाणपत्र व्हायरल झाले होते. यात शरद पवार हे ओबीसी असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवारांचे हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्राविषयी वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले.

2 Comments on “नामदेव जाधवांच्या तोंडाला काळे फासले”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *