नागपूर, 11 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) नागपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. राजू डोंगरे असे या खून झालेल्या नेत्याचे नाव आहे. ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस होते. कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव येथील ढाब्यावर त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना काल रात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांचा मृतदेह पाचगाव येथील विहिरगाव परिसरात आढळून आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर त्यांची हत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पंतप्रधान मोदींच्या गाण्याला ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकन
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या याठिकाणी घबराटीचे वातावरण आहे. तर त्यांच्या हत्येची बातमी कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवला.
दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा बसेस
तर राजू डोंगरे यांची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजू डोंगरे यांनी विजय मिळवला होता. तसेच ज्या ढाब्यावर राजू डोंगरे यांनी हत्या करण्यात आली, तो ढाबा राजू डोंगरे यांच्याच मालकीचा होता. त्यामुळे राजू डोंगरे यांची हत्या चोरी करण्याच्या हेतूने झाली की राजकीय वैमनस्यातून झाली? याचा पोलीस सध्या तपास करीत आहेत. तर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा तात्काळ शोध लावावा, अशी मागणी सध्या केली जात आहे.
2 Comments on “भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; आरोपी फरार”