चारित्र्यावर संशय घेऊन महिलेची हत्या; पती फरार, बारामती शहरातील घटना

बारामती, 05 फेब्रुवारी: बारामती शहरातील सिनेमा रोड येथील हॉटेल गंगासागर लॉज येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती. ही घटना काल (दि.04) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. ही मृत महिला दौंड तालुक्यातील सोनवडी येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रेखा विनोद भोसले (36) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी या महिलेच्या पतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद गणेश भोसले असे या महिलेच्या पतीचे नाव असून, त्याने त्याची पत्नी रेखा हिचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या या महिलेचा पती खून करून फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

पत्नीचा खून करून पती फरार

बारामतीतील हॉटेल गंगासागर लॉजवर ही घटना घडली होती. या घटनेनंतर बारामती शहरात एकच खळबळ उडाली. आरोपी विनोद याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खुन केल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विनोदनेच आपल्या मुलीचा खून केल्याचे मृत महिलेच्या वडिलांनी या तक्रारीत म्हटले आहे. त्यानूसार, विनोद गणेश भोसले याच्या विरोधात कलम 302 अंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तो फरार झाला आहे. त्याचा शोध चालू असून, त्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आलेली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक बारामती संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेके व इतर अधिकारी, अमंलदार हे सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *