पुण्यातील विविध प्रश्नांसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित शाह यांच्यासोबत बैठक

दिल्ली, 15 जून: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथील गृहमंत्रालयात भेट घेऊन यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत पुणे शहरातील विविध प्रश्नांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरू करणे आणि केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून पुणे महानगरपालिकेला प्रलंबित निधी देण्याच्या सकारात्मक चर्चा झाली.

https://twitter.com/mohol_murlidhar/status/1801650507922153538?s=19

टर्मिनल लवकरच सुरू होणार

या बैठकीत पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल कार्यान्वित करणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. हे दोन्ही विषय अमित शाह यांच्या अखत्यारित असून, त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर तातडीने या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिले असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली असून त्यासाठी आवश्यक असलेल्या सीआयएसएफच्या मनुष्यबळाची पूर्तता लवकरच गृहविभागाकडून करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली.

आपत्ती व्यवस्थापनाकडून निधी मिळावा

यामुळे नवे टर्मिनल सुरू करण्याला गती प्राप्त झाली आहे. हे टर्मिनल लवकर सुरू करून पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. पुणे महापालिकेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून येणारा निधी गेली काही काळ प्रलंबित होता. शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन व पूर नियंत्रणासाठी हा निधी तत्काळ मिळावा, अशी मागणी देखील या बैठकीत करण्यात आली. या मागणी संदर्भात ही अमित शाह यांनी सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *