बारामती, 3 फेब्रुवारीः बारामती शहरामध्ये वाहतूक वाढत आहेत. शहरातील गुणवडी चौक ते इंदापूर चौक व गुणवडी चौकाकडून रिंग रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक हातगाडे भाजीविक्रेते तसेच इतर हॉकर्स सकाळ- संध्याकाळ रस्त्यावर आपले दुकाने लावतात. त्यांच्यापुढे ग्राहक गाडीवर उभा राहतो. त्यामुळे कायम त्या भागामध्ये रस्त्यात वाहतूक कोंडी होते.
ग्रामीण क्षेत्रीय कार्यालयात नागरी सुविधा केंद्र सुरू
सणावाराच्या दिवशी व गुरुवारी तर त्या ठिकाणी चालणे सुद्धा दुरापास्त होते. अनेक छोटे-मोठे अपघात त्यामुळे होत आहेत. सदरचा परिसर हा नो- पार्किंग म्हणून घोषित केलेला आहे. तरीसुद्धा वारंवार कारवाई करून सुद्धा सुधारणा होत नाही. यामुळे बारामती नगरपरिषदेकडून होकर्सला विनंती करण्यात आली आहे की, आपण त्या ठिकाणी गाडे रस्त्याला अडथळा होईल, अशा परिस्थितीत लावू नये.
बारामती पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे रेशन ग्राहक वंचित!
यापुढे वाहतूक पोलीस व नगरपालिका यांच्यातर्फे यांच्यावर सत्ता कारवाई करण्यात येईल. या वाहतुकीच्या अडथळ्यामुळे भविष्यात कदाचित गंभीर अपघात होऊ शकतो. त्यामुळे सर्व आकर्षणी सहकार्य करावे, असे आवाहन बानपकडून करण्यात आले आहे.
One Comment on “हातगाडी धारकांना नगरपरिषदेचे आवाहन”