बारामतीकरांना नगरपरिषदेचे आवाहन

बारामती, 2 जानेवारीः बारामती शहरातील नागरिकांना मालमत्ता कर संदर्भात नगर परिषदेकडून आवाहन करण्यात आले आहे. बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत सन 2022-23 या चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी व जागा भाड्याची रक्कम भरणा करून नगर परिषदेस सहकार्य करावे, तसेच दंडात्मक आणि कटू कारवाई टाळावी, असे आवाहन बानपकडून करण्यात येत आहे.

जे मिळकतधारक थकबाकी आणि चालू वर्षाची रक्कम भरणा करणार नाहीत, त्यांचे नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकी धारकांची नावे दैनिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध करणे, मिळकती सील करणे, मिळकत अटकावून ठेवणे, मिळकत धारकांचे घरासमोर वाजंत्री वाजवणे, आदी प्रकारची कारवाई नगर परिषदेमार्फत करण्यात येणार आहे.

बारामतीमधील संस्थांनी प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन

शहर विकासात हातभार लावण्यासाठी व भविष्यात होणारी कटू कारवाई टाळण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे आदी कराची रक्कम भरणा करून बारामती नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी बारामतीकरांना केले आहे.

तसेच बानपकडून नागरिकांसाठी घरपट्टी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने भरण्याची मुभा दिली आहे. तसेच वसुली लिपिककडे घरी भरण्याची सोय आहे. यासह नगरपालिकेमध्ये नागरी सुविधा केंद्रात भरण्याची सुविधा देखील याआधीपासून सुरु आहे.

माळेगावात ऊस गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू

घरपट्टीची दिनांक 31 डिसेंबर 2022 अखेर वसुल वजा जाता शिल्लक बाकीः
मागील बाकी 18,46,99,592 रुपये,
चालू मागणी 115139275 रुपये,
एकूण येणे बाकी 299838867 रुपये आहे.

One Comment on “बारामतीकरांना नगरपरिषदेचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *