लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा रूट मार्च

मुंबई, 18 मे: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आज शहरात रूट मार्च काढला आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान हे शांततेत, मुक्त आणि निःपक्षपातीपणे पार पडणार असल्याचा विश्वास लोकांना देण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी लोकमान्य टिळक मार्ग ते पायधुनी पोलीस ठाणे पर्यंत रूट मार्च काढला. यावेळी पोलिसांनी लोकांना लोकसभा निवडणुकीदरम्यान शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1791727307478245652?s=19

मुंबई पोलिसांचा रूट मार्च

मुंबई पोलिसांच्या या रूट मार्चमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला. मुंबई पोलिसांनी या रूट मार्चदरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला या परिसराची माहिती दिली. ही लोकसभा निवडणूक शांततेत पार पडणार असल्याचा विश्वास यावेळी पोलिसांनी येथील लोकांना दिला आहे. तसेच या निवडणुकीचे मतदान कडेकोट बंदोबस्तात पार पडणार असल्याचा विश्वास देखील पोलिसांनी या रूट मार्च मधून दिला आहे.

https://twitter.com/CPMumbaiPolice/status/1791672055001411763?s=19

पोलीस आयुक्तांचे मतदारांना आवाहन

दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईच्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. “मी सर्व मुंबईकरांना जाहीर आवाहन करतो की, लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार दि. 20 मे 2024 रोजी मुंबईमध्ये मतदान होत आहे. तरी त्या दिवशी आपण आपल्या मतदानाचा हक्क जरूर बजावावा, असे विवेक फणसळकर म्हणाले आहेत. दरम्यान येत्या 20 मे रोजी राज्यातील 13 जगांसह मुंबईतील 6 जागांवर लोकसभेसाठी मतदान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *