उत्तर प्रदेश, 10 ऑक्टोबरः उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज, 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. मुलायमसिंग यादवांना 2 ऑक्टोबर रोजी रक्तदाबाचा त्रास आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती तेव्हापासून चिंताजनक होती.
Samajwadi Party supremo and former Uttar Pradesh CM Mulayam Singh Yadav passes away at the age of 82, confirms Akhilesh Yadav.
— ANI (@ANI) October 10, 2022
He was under treatment at Gurugram’s Medanta hospital since last week. pic.twitter.com/qDYIuT5DcH
मुलायम सिंह यादव हे समाजवादी पार्टी (सपा)चे संस्थापक नेता होते. तसेच ते माजी संरक्षण मंत्री, यासह ते उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. अनेक दशकांपासून ते उत्तर प्रदेशमधील राजकारणात प्रमुख भूमिका पार पाडल्या. उत्तर प्रदेशच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान आहे.
अजित पवारांच्या हस्ते माळेगाव कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ
मुलायम सिंह यादव यांच्या मृत्यूची पुष्टी करताना, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, “माझे आदरणीय पिताजी आणि सर्वांचे लाडके नेते मुलायम सिंह यादव आपल्याला सोडून गेले आहेत.