बारामती, 11 ऑक्टोबरः संपुर्ण जगाला शांततेचा आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहरात सर्व धर्म समभाव समितीच्या वतीने 9 ऑक्टोबर 2022 रोजी मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिरवणुकीत आलेल्या भाविकांना शरबत, मिठाई व लहान मुलांना खाऊ, तसेच 3000 नानकेट व फ्रुटीचे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना धार्मिक व प्रेषितांच्या जीवनावरील 1200 पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
उज्जैन मंदिरात सार्थक फौंडेशनकडून समोसे वाटप
याही वर्षी सर्व धर्म समभाव समितीच्या वतीने कोणत्याही प्रकारचे डी.जे. न लावता पारंपारीक पध्दतीने नाथ व कुरआनचे पठन करून पैगंबर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनोख्या पध्दतीने व डी.जे. ला फाटा देत पैगंबर जयंती साजरी केल्यामुळे पैगंबर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजक गणेश जोजारे व प्रतिक जोजारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष मोईनभाई शेख, उपाध्यक्ष चैतन्य गालिंदे उपस्थित होते. यासह सर्व धर्म समभाव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.