एमएससीबीचे अधिकारी खेळताहेत सर्वसामन्यांच्या जीवाशी

बारामती, 20 मार्चः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मोरगाव येथील एमएससीबीचे अधिकारी हे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. मोरगाव येथील राधाकृष्ण फिडरवरून मूर्तीकडे हनुमंत कोंडीबा शेलार यांच्या घराच्या जवळ असलेल्या महावितरणच्या डीपी वरती गेली अनेक दिवसापासून डीपीचा कट आऊट बॉक्स नसल्याची तक्रार आहे. तेथील नागरिक संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुद्धा या डीपीवरील कट आऊट बॉक्स बसत नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. सदर ठिकाणी कोणाचे हात जळालेले आहेत, तर कोणाला जीवाला गमवावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पळशी भाजप युवा मोर्चातर्फे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

महावितरणचे अधिकारी नाळे यांनी या डीपीकडे त्वरित लक्ष द्यावे व तेथील कट आऊट बॉक्स नवीन बसवून येथील नागरिकाचे जीव वाचवण्यास मदत करावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी अवेळी येथील फ्युज गेल्यानंतर नागरिकांना येथे आपल्या जीवाची खेळावे लागत असून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कट आऊट बॉक्स बसवून द्यावा, असे भारतीय जनता पार्टीचे बारामती तालुका सरचिटणीस बाळासाहेब बालगुडे यांनी माध्यमांना बोलताना सांगितले.

अनुसूचित जाती जमातीमधील 26 महिलांवर बलात्कार; पोलिसांच्या हलगर्जीपणाच्या तपासाचा फटका!

One Comment on “एमएससीबीचे अधिकारी खेळताहेत सर्वसामन्यांच्या जीवाशी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *