मुंबई, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये धोनी हुक्का ओढताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये काही लोक धोनीला ट्रोल करीत आहेत. तर काहीजण धोनीचे समर्थन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे धोनीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तर हा व्हिडिओ कधीचा आहे? याविषयी कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. तसेच तो ओढत असलेला हुक्का आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
https://x.com/_FaridKhan/status/1743721272683467205?s=20
हुक्का आहे की नाही? याची स्पष्टता नाही
एमएस धोनीचा सध्या एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका पार्टीतील असल्याचे दिसत आहे. तर या व्हिडिओत धोनीने सुट परिधान केला असून, तो हुक्का ओढताना दिसत आहे. तसेच यावेळी धोनीच्या आजूबाजूला उभे असलेले लोकही हुक्का ओढताना दिसत आहेत. मात्र, तो हुक्का आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतू त्याच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण धोनीवर टीका करत आहेत. तर काहीजण धोनीच्या समर्थनात पुढे आले आहेत. “हा हर्बल शिशा आहे. ते आरोग्यासाठी चांगले आहे आणि त्यात तंबाखू नाही. धोनीला ट्रोल करणे थांबवा! असे काही जणांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
धोनी दुबईत एन्जॉय करताना दिसला होता
तर काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या फॅमिलीसोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबईत गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबतच भारताचा क्रिकेटपटू रिषभ पंत आणि अभिनेत्री क्रिती सेनन हे पाहायला मिळाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे दुबईमधील काही फोटो समोर आले होते. तसेच धोनीने नुकतीच प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन याच्यासोबत एक जाहिरात देखील शूट केली आहे. दरम्यान, महेंद्रसिंग धोनी यंदाच्या आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.