बड्या मंडळींच्या अतिक्रमणाविरोधात प्रबुद्ध युवक संघटनेचे आंदोलन

बारामती, 7 जूनः बारामतीमध्ये बारामती नगर परिषदेचे नगरसेवक, गटनेते आणि माजी नगराध्यक्षांच्या वारसांनी कोणतीही परवानगी न घेता तसेच आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर पार्किंग केल्याचे चित्र आहे. बानपकडूनही महालक्ष्मी शोरूम, नेक्सा शोरूम व फलटण रोड येथील महालक्ष्मी फोर व्हीलर गाड्यांच्या शोरूमला उपविभागीय अधिकारी, बारामती यांनी रहिवासी परवानगी दिली असूनही सदर ठिकाणी वाणिज्य वापर सर्रासपणे सुरु आहे. परंतु बारामती नगर परिषदेच्या गटनेत्याने कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी न करता, आपण बोलतो तो कायदा?  याप्रमाणे सर्व कायद्याची पायमल्ली केली आहे.

या भक्कम अतिक्रमणांवर आज तागयत दिलेल्या परवानगी बद्दल तक्रार देऊन ही बानपच्या कर विभागचे महेश आगवणे यांनी कोणत्याही प्रकारची शास्ती लावलेली नाही. उलट शोरुमची खोटी मोजमाप घेऊन, बारामती नगर परिषदेची फसवणूक केलेली आहे.

माझी वसुंधरा अभियानात बारामती नगरपरिषदेचा पुन्हा डंका

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या पार्किंग, स्टोर, गॅरेजची बांधकामांत वाढ करूनही कोणत्याही प्रकारची शास्ती न लावता आणि बेकायदेशीर बांधकाम करून सार्वजनिक रोडवर येण्या जाण्याचा बेकायदेशीर रोड थांबवलेला आहे. तरी सुद्धा गुन्हा दाखल न करता नगररचनाचे सहाय्यक नगर रचनाकार ऋषिकेश साळी संबंधित शोरूम मालकाला अभय देत आहे. अशा अधिकाऱ्यांवरही मुख्याधिकारी यांनी कारवाई केलीच पाहिजे.

दरम्यान, बारामतीमधील समर्थ नगर कडे जाणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात गैर सोय होत आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या लोकांच्या व किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या टपऱ्या वाहतूक कोंडीमुळे काढून टाकले आहेत. मात्र या बड्या मंडळींच्या बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांना अभय दिले जात आहे. तसेच सर्व दुचाकी वाहनाची पार्किंग रोडवर करत आहेत. यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यावर बारामती नगरपरिषद व पोलीस प्रशासन गप्प का आहेत? असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होत आहे.

मोईन बागवान आणि स्वराज वाबळे यांची एमपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी निवड

या सर्व बेकायदेशीर कृत्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा बारामती नगरपरिषदेचे नगररचनाकार साळी आणि आगवणे देत असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व बाबींविरोधात प्रबुद्ध युवक संघटनेतर्फे अभिजीत कांबळे यांनी 6 जून 2023 पासून बारामती नगर परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत. सदर बेकाशीर पार्किंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे. अन्यथा प्रबुद्ध युवक संघटनेकडून बारामती नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सम्राट गायकवाड यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा तीव्र इशारा अध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी दिला आहे.

One Comment on “बड्या मंडळींच्या अतिक्रमणाविरोधात प्रबुद्ध युवक संघटनेचे आंदोलन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *