बारामती, 21 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील मोरगावाचा पाणीपुरवठा ठप्प करण्यात आला आहे. मोरगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी थकीत असल्याने पाणीपुरवठा ठप्प करण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव हे तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांची श्री मयूरेश्वरच्या दर्शनासाठी गर्दी असते. त्यातच या परिसरात पाण्याचा दुसरा स्रोत नसल्याने ग्रामस्थांसह भाविकांना शुध्द पाणी विकत घ्यावे लागत आहे.
साठवण तलावाच्या खोदकामामुळे बारामतीचा रस्ता झाला धुळग्रस्त!
दरम्यान, मोरगाव ग्रामपंचायतीने पाणीपट्टी, घरपट्टीबाबत वारंवार आवाहन केले होते. मात्र, थकबाकीदारांनी कर भरला नाही. ग्रामपंचायतची लाखो रुपयांची थकबाकी आहे. मोरगावला पाणीपुरवठा करणारे वीज जोडणी नाझरे जलाशयातून खंडित केल्याने मोरगावचा नळ पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मोरगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
ग्रामपंचायतीमार्फत काही रक्कम भरली आहे. तरीही या योजनेचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. वीज तोडल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला आहे, असे मोरगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जितेंद्र साळुंके यांनी सांगितले आहे.
आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
One Comment on “मोरगावचा पाणीपुरवठा ठप्प”