बारामती, 9 जानेवारीः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मोरगांव- सोमेश्वर रोडवरील वरकडवाडी ते पळशी दरम्यान पुलाचे काम करण्यासाठी खड्डा खोदलेला आहे. सदर रोडच्या साईटने जा-ये करण्यासाठी रस्ता तयार केलेला आहे. मात्र त्या रस्त्याला सुरक्षा गार्ड नाहीत.
मुढाळे गावात भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक संपन्न
सदर रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी संबंधित ठेकेदाराने आपली जबाबदारी ओळखून आणि नागरिकांचे जीवाशी न खेळता सदर रोडवर दिशादर्शक फलक लावावेत. तसेच जा- ये करणाऱ्या वाहनांसाठी पांढरा चुना किंवा फक्किंग मारून संबंधित रोडवर योग्यरीत्या जा- ये करण्यासाठी व्यवस्थित करून साईट रोड वरती पाणी मारून घ्यावेत, असे येथील स्थानिक आप्पासाहेब बरकडे यांनी मागणी केली आहे.
दरम्यान, 7 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास साधना गुलदगड- बंडगर व त्यांचे पती आप्पा बंडगर हे दोघे पळशीकडे जात असताना समोरील खड्डा लक्षात न आल्याने ते खड्ड्यात जाता जाता वाचले. तरी संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम
सार्वजनिक बांधकाम खाते बारामती यांनी याकडे लक्ष द्यावे व काम दर्जेदार करून घ्यावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच त्यांनी संबंधित ठेकेदारांना तशा सूचना कराव्यात आणि कामांमध्ये हलगर्जीपणा केल्यास जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी ‘भारतीय नायक’ शी बोलताना केली आहे.
One Comment on “ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने मोरगांव पळशी रोड बनला धोकादायक”