राज्यात 9.70 कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार, पुणे जिल्ह्यात किती मतदार?

पुणे, 05 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची संख्या आहे. त्यामध्ये 5 कोटी 22 हजार 739 पुरूष मतदार आहेत. तसेच 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार आहेत. तर 6 हजार 101 इतके तृतीयपंथी मतदार आहेत. याबाबतची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी मतदार आहेत.

https://x.com/Info_Pune/status/1853442296362205259?t=2bL2fpWtobdq6ocLtKZzqQ&s=19

पुणे जिल्ह्यात इतके मतदार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात एकूण 88 लाख 49 हजार 590 इतकी मतदारांची संख्या आहे. यामध्ये 45 लाख 79 हजार 216 पुरूष मतदार आहेत. 42 लाख 69 हजार 569 महिला मतदार आणि 805 तृतीयपंथी मतदार आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 78 हजार 928 मतदारांची संख्या आहे. यामध्ये 3 लाख 36 हजार 921 पुरूष मतदार आहेत. तर 3 लाख 41 हजार 934 महिला मतदार आणि 3 तृतीयपंथी मतदार आहेत.

पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांतील मतदारांची संख्या

1) जुन्नर मतदारसंघात एकूण 3 लाख 25 हजार 764 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 65 हजार 373 पुरूष, 1 लाख 60 हजार 385 महिला मतदार आणि 6 तृतीयपंथी मतदार आहेत.
2) आंबेगाव मतदारसंघात एकूण 3 लाख 14 हजार 252 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 59 हजार 469 पुरूष, 1 लाख 54 हजार 773 महिला मतदार आणि 10 तृतीयपंथी मतदार आहेत.
3) खेड आळंदी मतदारसंघात एकूण 3 लाख 76 हजार 623 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 93 हजार 719 पुरूष मतदार, 1 लाख 82 हजार 892 महिला मतदार आणि 12 तृतीयपंथी मतदार आहेत.
4) शिरूर मतदारसंघात एकूण 4 लाख 66 हजार 042 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 41 हजार 787 पुरूष मतदार, 2 लाख 24 हजार 232 महिला मतदार आणि 23 तृतीयपंथी मतदार आहेत.
5) दौंड मतदारसंघात एकूण 3 लाख 19 हजार 311 मतदार आहेत. यामध्ये 1 हजार 63 हजार 917 पुरूष मतदार, 1 लाख 55 हजार 383 महिला मतदार आणि 11 तृतीयपंथी मतदार आहेत.
6) इंदापूर मतदारसंघात एकूण 3 लाख 41 हजार 485 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 74 हजार 832 पुरूष मतदार, 1 लाख 66 हजार 631 महिला मतदार आणि 22 तृतीयपंथी मतदार आहेत.
7) बारामती मतदारसंघात एकूण 3 लाख 80 हजार 608 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 92 हजार 819 पुरूष मतदार, 1 लाख 87 हजार 765 महिला मतदार आणि 24 तृतीयपंथी मतदार आहेत.
8) पुरंदर मतदारसंघात एकूण 4 लाख 64 हजार 017 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 40 हजार 538 पुरूष मतदार, 2 लाख 23 हजार 446 महिला मतदार आणि 33 तृतीयपंथी मतदार आहेत.
9) भोर मतदारसंघात एकूण 4 लाख 30 हजार 278 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 27 हजार 340 पुरूष मतदार, 2 लाख 02 हजार 930 महिला मतदार आणि 8 तृतीयपंथी मतदार आहेत.
10) मावळ मतदारसंघात एकूण 3 लाख 86 हजार 172 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 97 हजार 436 पुरूष मतदार, 1 लाख 88 हजार 723 महिला मतदार आणि 13 तृतीयपंथी मतदार आहेत.
11) चिंचवड मतदारसंघात एकूण 6 लाख 63 हजार 622 मतदार आहेत. यामध्ये 3 लाख 48 हजार 450 पुरूष मतदार, 3 लाख 15 हजार 115 महिला मतदार आणि 57 तृतीयपंथी मतदार आहेत.
12) पिंपरी मतदारसंघात एकूण 3 लाख 91 हजार 607 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 04 हजार 005 पुरूष मतदार, 1 लाख 87 हजार 568 महिला मतदार आणि 34 तृतीयपंथी मतदार आहेत.
13) भोसरी मतदारसंघात एकूण 6 लाख 8 हजार 425 मतदार आहेत. यामध्ये 3 लाख 28 हजार 280 पुरूष मतदार, 2 लाख 80 हजार 048 महिला मतदार आणि 97 तृतीयपंथी मतदार आहेत.
14) वडगाव शेरी मतदारसंघात एकूण 5 लाख 03 हजार 539 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 59 हजार 453 पुरूष मतदार, 2 लाख 43 हजार 984 महिला मतदार आणि 102 तृतीयपंथी मतदार आहेत.
15) शिवाजीनगर मतदारसंघात एकूण 2 लाख 95 हजार 117 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 48 हजार 732 पुरूष मतदार, 1 लाख 46 हजार 340 महिला मतदार आणि 45 तृतीयपंथी मतदार आहेत.
16) कोथरूड मतदारसंघात एकूण 4 लाख 40 हजार 557 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 28 हजार 795 पुरूष मतदार, 2 लाख 11 हजार 740 महिला मतदार आणि 22 तृतीयपंथी मतदार आहेत.
17) खडकवासला मतदारसंघात एकूण 5 लाख 76 हजार 505 मतदार आहेत. यामध्ये 3 लाख 03 हजार 684 पुरूष मतदार, 2 लाख 72 हजार 780 महिला मतदार आणि 41 तृतीयपंथी मतदार आहेत.
18) पर्वती मतदारसंघात एकूण 3 लाख 60 हजार 974 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 83 जाणार 139 पुरूष मतदार, 1 लाख 77 हजार 739 महिला मतदार आणि 96 तृतीयपंथी मतदार आहेत.
19) हडपसर मतदारसंघात एकूण 6 लाख 25 हजार 675 मतदार आहेत. यामध्ये 3 लाख 28 हजार 082 पुरूष मतदार, 2 लाख 97 हजार 515 महिला मतदार आणि 78 तृतीयपंथी मतदार आहेत.
20) पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात एकूण 2 लाख 95 हजार 382 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 49 हजार 422 पुरूष मतदार, 1 लाख 45 हजार 926 महिला मतदार आणि 34 तृतीयपंथी मतदार आहेत.
21) कसबा पेठ मतदारसंघात एकूण 2 लाख 83 हजार 635 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 39 हजार 944 पुरूष मतदार, 1 लाख 43 हजार 654 महिला मतदार आणि 37 तृतीयपंथी मतदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *