बारामती, 21 डिसेंबरः बारामती तालुक्याती मोरगांव येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 ची लढत ढोले व तावरे गटात चुरशीची झाली होती. या लढतीमध्ये पोपट तावरे यांच्या श्री मयुरेश्वर गणेश सर्वधर्म पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार अलका पोपट तावरे या विजयी झाल्या आहेत. तर पुणे मनपाचे उपायुक्त संदीप ढोले यांच्या पत्नी तसेच श्री विघ्नहर्ता पॅनल सरपंच पदाच्या उमेदवार रोहिणी ढोले यांचा दारुण पराभव झाला आहे.
पणदरे ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाची समजली जाणारी मोरगांव येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचार सभेत आरोप-प्रत्यारोपांची फैरीमुळे लढत मोठी चुरशीची बनली होती. दरम्यान, 18 डिसेंबर 2022 रोजी सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये कैद झाले होते. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल काल, 20 डिसेंबर 2022 रोजी घोषित झाला. यामध्ये पोपट उर्फ कैलास तावरे यांच्या पत्नी अलका पोपट तावरे थेट जनतेतून सरपंच पदाच्या उमेदवार निवडणूक आल्या आहेत. तर रोहिणी ढोले यांचा दारुण पराभव झाला आहे. तसेच ढोले गटास केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.
मोरगांव येथील प्रभाग क्र. 1 मधून अक्षय यशवंत तावरे, मनिषा अतुल नेवसे , शितल राहुल तावरे, प्रभाग क्र. 2 मधून ढोले पॅनलचे मयूर अनिल वाघचौडे व लता दत्तात्रय ढोले विजयी झाल्या. प्रभाग क्र. 3 मधून गणेश सुरेश तावरे, तर प्रभाग क्र. 4 मधून सचिन रमेश गारडे, केदार विघ्नहर वाघ, सुषमा चंद्रकांत कुचेकर, प्रभाग क्र. 5 मधून निलेश हरीभाऊ केदारी, मनिषा सचिन नेवसे, आशा गणेश तावरे तर प्रभाग क्र. 3 मधून सारीका बाळासो गायकवाड या बिनविरोध निवडून आल्या होत्या.
कुरणेवाडी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!
या निवडणूकीमध्ये सरपंच पदासाठी उभ्या राहिलेल्या पुणे मनपाचे उपायुक्त संदीप ढोले यांच्या पत्नीचा पराभव झाल्याने तावरे गटाकडे पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळाली आहे. मोरगांव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर काल, मंगळवारी तावरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गावात मोठा जल्लोष करण्यात आला.
One Comment on “मोरगांव ग्रामपंचायत निवडणूक झाली चुरशीची!”