मुढाळे गावात भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक संपन्न

बारामती, 8 जानेवारीः(प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुढाळे गाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज, रविवार 8 जानेवारी 2023 रोजी भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक संपन्न झाली आहे. यावेळी पत्रकार दिनही साजरा करण्यात आला. या प्रसंगी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मुढाळे गावच्या सरपंच प्रिया वाबळे, भारतीय पत्रकार संघ अध्यक्ष काशिनाथ पिंगळे तसेच वडगांव निंबाळकर ठाणे अंकित करंजेपुल दुरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

या मासिक बैठकीमध्ये पत्रकार संघ वाढ तसेच अनेक महत्त्वाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ही बैठक अध्यक्ष पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या खेळी- मेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा वाढला धोका!

या प्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, सचिव सोमनाथ लोणकर, प्रसिद्धी प्रमुख सुशीलकुमार अडागळे, हल्ला कृती समिती प्रमुख निखिल नाटकर, ज्येष्ठ पत्रकार संघटक महंमद शेख, सदस्य शंतनु साळवे, अजय पिसाळ, शरद भगत, अविनाश बनसोडे, मुढाळे ग्रामविकास अधिकारी धावडे, पोलीस हवालदार नागटीळक यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश बनसोडे यांनी केले तर आभार शंतनु साळवे यांनी मानले.

One Comment on “मुढाळे गावात भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *