बारामतीत तोडफोड करणाऱ्या गँगवर मोक्कांतर्गत कारवाई

बारामती, 18 डिसेंबरः बारामती शहरातील फलटण चौकातील हॉटेल दुर्वाजमध्ये 11 नोव्हेंबर 2022 रोजी भर दुपारी पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आदेश कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर, ऋषिकेश चंदनशिवे, तेजस बच्छाव, यश जाधव यांनी तोडफोड केली. तसेच हॉटेल चालकावर आणि कामगारांवर दहशत बसवण्यासाठी व त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली. यासह हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

नाताळ म्हणजे पुनरुत्थानाचा प्रारंभ

या घटनेत फिर्यादी हॉटेल चालकाच्या डोक्यात 13 टाके पडले होते. त्यानंतर या सर्व आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, घराविषयी आगळीक व दंगल या भादवीच्या कलमाप्रमाणे 307, 384, 427, 143, 147,149 सह अर्म act 4 25 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर गँगने यापूर्वी सुद्धा बारामतीत दहशत पसरवण्यासाठी गुन्हे केलेले आहेत. प्रचलित कायद्याचा धाक त्यांना राहिला नव्हता. त्यामुळे या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना पाठवला.

या गुन्हेगारांची पार्श्वभूमी बघता विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मोक्कांतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना विशेष सहाय्य केले. या गुन्ह्याला मोक्का कायद्यांतर्गत कलमांचा समावेश करून या गुन्हेगारांना मोक्का कोर्टातून कडून ताब्यात घेऊन याचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत.

अवैध हातभट्टी दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

One Comment on “बारामतीत तोडफोड करणाऱ्या गँगवर मोक्कांतर्गत कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *