मोहम्मद शमीला अर्जून पुरस्कार जाहीर!

भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी घोषणा

पुणे, 20 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशात यावर्षीच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्यासह अन्य 25 खेळाडूंची ही अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. खेळ आणि खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार मागील 4 वर्षांतील चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खिलाडूवृत्ती आणि शिस्तीची भावना दर्शविल्याबद्दल दिला जातो. यासंदर्भातील माहिती भारताच्या क्रिडा मंत्रालयाने दिली आहे. या खेळाडूंना 9 जानेवारी 2024 रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यासाठी राष्ट्रपती भवनात एक कार्यक्रम पार पडणार आहे.



या पुरस्कारांसाठी आपले नाव नोंदवण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्था यांना हे अर्ज करण्याची परवानगी होती. यावर्षी या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. ज्यांचा न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, सेवानिवृत्त यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने विचार केला होता. समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य छाननीनंतर, सरकारने खालील खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/PIB_India/status/1737407323344359520?s=19


अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावे:-

1) ओजस प्रविण देवतळे (धनुर्विद्या)

2) अदिती गोपीचंद स्वामी (धनुर्विद्या)

3) श्रीशंकर एम (ऍथलेटिक्स)

4) पारुल चौधरी (ऍथलेटिक्स)

5) मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)

6) आर वैशाली (बुद्धिबळ)

7) मोहम्मद शमी (क्रिकेट)

8) अनुष अग्रवाला (घोडेस्वार)

9) दिव्यकृती सिंग (घोडेस्वार ड्रेसेज)

10) दिक्षा डागर (गोल्फ)

11) कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)

12) पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी)

13) रितू नेगी (कबड्डी)

14) पवन कुमार (कबड्डी)

15) नसरीन (खो-खो)

16) मिस पिंकी (लॉन बाऊल्स)

17) ऐश्वरी प्रताप सिंह तोमर (शूटिंग)

18) ईशा सिंग (शूटिंग)

19) पाल सिंग संधू (स्क्वॅश)

20) अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)

21) सुनील कुमार (कुस्ती)

22) मिस अंतीम (कुस्ती)

23) नौरेम रोशिबिना देवी (वुशू)

24) शीतल देवी (पॅरा धनुर्विद्या)

25) इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)

26) प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *