शिर्डी, 26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.26) शिर्डीच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीमध्ये दाखल होतील. यादरम्यान ते श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन घेतील. त्यामुळे शिर्डी मंदिरातील साईबाबा समाधी दर्शन सामान्य भाविकांसाठी 30 मिनिटे बंद राहणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी या दौऱ्यामध्ये सुमारे 7500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
मनोज जरांगे यांना रोहित पवारांचा पाठिंबा, अन्नत्याग करणार!
यामध्ये नरेंद्र मोदी हे साई मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करतील. त्यामुळे साईभक्तांना आरामात दर्शन घेता येणार आहे. तसेच या संकुलात 10 हजार भक्तांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. यासोबतच अनेक सोई सुविधा या नवीन दर्शन रांग संकुलाच्या माध्यमातून भाविकांना मिळणार आहेत. त्यानंतर मोदी यांच्या हस्ते 2 वाजण्याच्या सुमारास अहमदनगर येथील निलवंडे धरणाचे जलपूजन होणार आहे. या धरणामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 180 पेक्षा अधिक गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय!
या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शिर्डी येथे पार पडणार आहे. यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 हप्त्यांत देण्यात येणार आहे. यासोबतच मोदी हे तर या योजनेचा लाभ राज्यातील 86 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या या दौऱ्यात आरोग्य सेवांचे तसेच रस्ते आणि रेल्वे मार्गांचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, खबरदारी घेत याठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तर या कार्यक्रमांच्या नंतर पंतप्रधान हे गोव्याला रवाना होणार आहेत.
One Comment on “मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर! अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार”