जालना/ अंतरवाली सराटी, 27 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मराठा आरक्षण संदर्भात चर्चा केली असेल, अशी आम्हाला आशा होती. मात्र, पंतप्रधान मोदी हे त्यांच्या शिर्डी येथील सभेत मराठा आरक्षणावर एक अक्षर देखील बोलले नाहीत. त्यामुळे तुम्ही पंतप्रधानांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सांगितले होते का? आणि जर तुम्ही त्यांना याबाबत सांगितले असेल तर, पंतप्रधान मोदी हे जाणूनबुजून मराठा आरक्षणावर बोलले नाहीत काय? असे प्रश्न जरांगे पाटलांनी यावेळी उपस्थित केले आहेत.
प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस
“पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या पाठीशी कायम असतात, असे ऐकले होते. मात्र, त्यांना आता गोरगरीबांची गरज नाही. नरेंद्र मोदी यांनी कालच्या शिर्डी येथील सभेत मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करायला हवी होती. मात्र त्यांनी असे काहीच केले नाही. त्यामुळे असे दिसते की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविषयी पंतप्रधानांना कोणतीही कल्पना दिली नाही किंवा पंतप्रधान मोदी हे मराठा आरक्षणाबाबत जाणूनबुजून बोलले नाहीत. अशी शंका आमच्या मनात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंदोलनाविषयी बोलले नाहीत याबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही. जर मराठा समाजाने विचार केला असता तर पंतप्रधान मोदी यांचे विमान काल उतरूच दिले नसते.” असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसेच मराठा समाजाची मुले मोठी होऊन पुढे जाऊ नयेत, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना वाटत आहे.” असा आरोप देखील जरांगे पाटलांनी यावेळी केला.
प्रलंबित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या प्रस्तावाला अखेर मंजूरी!
तत्पूर्वी, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 25 ऑक्टोंबर पासून त्यांच्या आंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे राज्य सरकार या मराठा आरक्षणाचा तिढा कसा सोडवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
One Comment on “मराठा आरक्षणाबाबत मोदी जाणुनबुजून बोलले नाहीत – जरांगे पाटील”