कृषिदुतांकडून चाकोरे गावात शेतीत आधुनिक प्रयोग

माळशिरस, 10 ऑगस्टः (प्रतिनिधी- शरद भगत) सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील चाकोरे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या श्रीराम कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या कृषिदुतांचे 1 ऑगस्ट रोजी आगमन झाले. सदर गावात कृषी कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महिने राबविण्यात येणार आहे. यामध्ये कृषिदुत हे शेतकऱ्यांना विविध पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि कापणी पाश्चात प्रक्रिया तसेच शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती गावकऱ्यांना देणार आहेत.

बारामती तालुक्यातील दुष्काळ गावांचा रखडलेला प्रश्न आमदार पडळकरांच्या दरबारी!

या उपक्रमातून शेतकऱ्यांना माहिती नसलेल्या गोष्टी माहिती होतील. या वेळी चाकोरे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक राहुल वाघमारे, ग्रामविकास अधिकारी आर. एम. चव्हाण, सरपंच प्रतिनिधी नवनाथ विठ्ठल जाधव, उपसरपंच सचिन कचरे, ग्रामपंचायत कर्मचारी विक्रम ढवळे, प्रगतशील बागायतदार अमित कुंभार, बापूराव वाघमोडे व हणमंत करडे आणि कृषिदुत रजनीश भोसले, सिद्धराज देशमुख, बाबुराव धावडे, श्रेयस गुरव, निलेश काळे, विजय पाटील, अर्शद शेख तसेच ग्रामस्थ व ग्रापंचायत सदस्य उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेची तालुका कार्यकारिणी जाहीर

यासाठी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शिका श्रीलेखा पाटील, सचिव अभिषेक पाटील, सहसचिव करण पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद झगडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. बी. हाके, उप प्राचार्य डॉ. एस. डी. राऊत, रावे प्रमुख डॉ. जे. आय. शेख यांचे उपक्रमास मार्गदर्शन लाभले.

2 Comments on “कृषिदुतांकडून चाकोरे गावात शेतीत आधुनिक प्रयोग”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *