‘त्या’ बेकायदेशीर मोबाईल टॉवरला मोठा दणका

बारामती, 21 एप्रिलः बारामती शहरातील सर्वोदय नगरमध्ये एका सदनीकेत मोबाईल टॉवर उभारण्याचा काम काही दिवसांपासून सुरु आहे. या टॉवरच्या कामामुळे आसपास राहणाऱ्या स्थानिकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सर्व स्थानिकांनी एकत्र येत बारामती नगर परिषदेला आणि महावितरणला या टॉवर विरोधात अर्ज दाखल केला आहे. आता या अर्जाची दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील सर्वोदय नगर हौसिंग सोसायटीमध्ये कमर्शियल फायद्यासाठी सचिन जाधव यांच्या राहत्या घरात बेकायदेशीर रित्या आयडिया कंपनीचा मोबाईल टॉवर उभारला आहे. तसेच हा मोबाईल टॉवर उभारण्यासाठी बारामती नगर परिषदेची कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच या मोबाईल टॉवरमुळे भविष्यात आरोग्याचा प्रश्न आणि संभाव्य मोठा अपघात यामुळे सर्वोदय नगर आणि चंद्रमणी नगर येथील स्थानिकांनी याला विरोध करत अर्ज केला आहे. या अर्जाची दखल आता बारामती महावितरणने घेतला आहे. सदर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. यामुळे अपुऱ्या कागदपत्रांच्या अभावी महावितरणाने सदर मोबाईल टॉवरचा विज पुरवठा खंडित करून कारवाई केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *