मिचेल स्टार्क ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!

दुबई, 19 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल 2024 साठी सध्या दुबईत मिनी लिलाव सुरू आहे. यामध्ये 333 खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून खरेदी केले. त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

https://twitter.com/IPL/status/1737058599870837021?s=19

मिचेल स्टार्कला आपल्या संघात खरेदी करण्यासाठी सुरूवातीला दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस होती. मात्र 10 कोटींच्या घरात बोली गेल्यानंतर त्यावेळी दिल्ली आणि मुंबईने माघार घेतली. त्यानंतर स्टार्कला खरेदी करण्यासाठी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली. अखेर यामध्ये कोलकात्याने बाजी मारत मिचेल स्टार्क याला 24.75 रुपयांची बोली लावून आपल्या संघात खरेदी केले.

https://twitter.com/IPL/status/1737034617297760660?s=19

पॅट कमिन्स दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला 

या लिलावात मिचेल स्टार्कचे नाव येण्याच्या काही वेळापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर 20.50 कोटी रुपयांची विक्रमी बोली लागली होती. त्याला सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले आहे. पण त्याचा हा विक्रम मिचेल स्टार्कने काही वेळातच मोडीत काढला. त्यामुळे मिचेल स्टार्क हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

आयपीएल इतिहासातील 5 सर्वात महागडे खेळाडू:-

1) मिचेल स्टार्क- 24.75 कोटी रुपये – (केकेआर, 2024)

2) पॅट कमिन्स – 20.50 कोटी रुपये – (सनरायझर्स हैदराबाद, 2024)

3) सॅम करन 18.50 कोटी रुपये – (पंजाब किंग्ज, 2023)

4) कॅमेरॉन ग्रीन – 17.50 कोटी रुपये (मुंबई इंडियन्स, 2023)

5) बेन स्टोक्स – 16.25 कोटी रुपये (चेन्नई सुपर किंग्स, 2023)

मिनी लिलाव 2024 मध्ये खरेदी झालेले महत्त्वाचे खेळाडू:-


1) मिचेल स्टार्क – कोलकाता नाईट रायडर्स – 24.75 कोटी रुपये

2) पॅट कमिन्स – सनरायझर्स हैदराबाद – 20.50 कोटी रुपये

3) डॅरिल मिशेल – चेन्नई सुपर किंग्स – 14 कोटी रुपये

4) रोवमन पॉवेल – राजस्थान रॉयल्स – 7.40 कोटी रुपये

5) ट्रॅव्हिस हेड – सनरायझर्स हैदराबाद – 6.80 कोटी रुपये

6) रचिन रवींद्र – चेन्नई सुपर किंग्स – 1.80 कोटी रुपये

7) जेराल्ड कोएत्झी  – मुंबई इंडियन्स – 5 कोटी रुपये

8) हर्षल पटेल – पंजाब किंग्ज – 11.75 कोटी रुपये

9) अल्झारी जोसेफ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 11.50 कोटी रुपये

10) उमेश यादव – गुजरात टायटन्स – 5.8 कोटी रुपये

11) शार्दुल ठाकूर – चेन्नई सुपर किंग्स – 4 कोटी रुपये

12) शिवम मावी – लखनौ सुपर जायंट्स – 6.40 कोटी रुपये

13) ख्रिस वोक्स – पंजाब किंग्ज – 4.20 कोटी

14) हॅरी ब्रूक – दिल्ली कॅपिटल्स – 4 कोटी रुपये

15) वानिंदू हसरंगा – सनरायझर्स हैदराबाद – 1.50 कोटी रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *