मिनी बस आणि ट्रकचा अपघात; 7 भाविकांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा अपघात

हरियाणा, 24 मे: (विश्वजीत खाटमोडे) हरियाणातील अंबाला येथे आज एक भीषण अपघात झाला आहे. हरियाणाच्या अंबाला-दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सात जण एकाच कुटुंबातील आहेत. ते सर्वजण मिनी बसमधून बुलंदशहर येथून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी अंबाला येथे आज पहाटेच्या सुमारास ट्रक आणि मिनी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

https://twitter.com/ANI/status/1793838772796485738?s=19

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते

मिनी बसमध्ये एकूण 26 जण प्रवास करत होते. ते सर्वजण माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. वाटेत त्यांची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मिनी बसचा चक्काचूर झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा या बसमध्ये अनेक भाविक अडकले होते. यावेळी पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. सध्या अंबाला पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.

जखमींवर रूग्णालयात उपचार

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी प्रवाशांना जवळच्या अंबाला कॅन्टोन्मेंटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याचा शोध पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *