मिलिंद देवरा यांनी फेरविचार करावा, वर्षा गायकवाड यांची विनंती

मुंबई, 14 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर यासंदर्भात मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले आहे. मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच मिलिंद देवरा यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती वर्षा गायकवाड यांनी यावेळी केली आहे.

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1746401534303519156?s=19

वर्षा गायकवाड ट्विटमध्ये काय म्हणाल्या?

मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस परिवार आपण एक कुटुंब आहोत. देवरा परिवार आणि काँग्रेस हे वेगळे समीकरण आहे. त्यामुळे आपण जो निर्णय घेतला आहे त्याचा फेरविचार करावा, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही मिलिंदजींशी सातत्यानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस परिवार एकत्र राहायला हवा, हाच काँग्रेस प्रभारी यांच्यासह आम्हा सर्वांचा कायम प्रयत्न राहिला. परंतू, दुर्दैवाने आम्ही सकाळी मिलिंद देवरा यांचे राजीनामा दिल्याचे ट्विट पाहिले. आज मणिपूर पासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत आहे आणि अशा वेळेला त्यांनी घेतलेला हा निर्णय मनाला कुठेतरी खेद लावणारा आहे, अशा वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

मिलिंद देवरा आता कोणता निर्णय घेणार?

दरम्यान, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून मिलिंद देवरा हे नाराज आहेत. या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला होता. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर मिलिंद देवरा हे आता शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *