बारामतीत मायक्रोसॉफ्ट उभारणार कृषि प्रकल्प

बारामती, 8 नोव्हेंबरः बिल गेट्स यांच्या संकल्पनेतून मायक्रोसॉफ्ट या कंपनीने कृषी क्षेत्रावर आधारित संशोधन प्रकल्प विकसित करण्याचे पाउल उचलले आहे. यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर फार्मव्हिब्स डॉट आय(Farmvibes.ai) या संशोधन प्रकल्पासाठी गुणवत्ता केंद्र बारामती येथे उभारण्यात येणार आहे. जे मायक्रोसॉफ्टच्या संशोधन संघ व ऑक्सफर्ड विद्यापीठातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स ऑफ अग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आणि क्लायमेट चेंज कोर्सचा उपक्रम राबवणारे डॉ. अजित जावकर आणि त्यांचा संघ सोबत काम करणार आहेत. या पद्धतीचे कृषी संधोधन केंद्राची निर्मिती मायक्रोसॉफ्ट कंपनीने युनायटेड स्टेट मधील वॉशिंग्टन येथे केली आहे. तसेच अभिमानास्पद म्हणजे वॉशिंग्टन नंतरचे दुसरे सेंटरची निर्मिती करण्यासाठी भारतातील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेची निवड केली आहे.

उजनीचं पाणी बारामती, इंदापूरला मिळणार नाही?

फार्मव्हिब्स डॉट आय प्रकल्प हा मायक्रोसॉफ्ट रिसर्च मधील शेती केंद्रित तंत्रज्ञानाचा एक नवीन संच आहे. मायक्रोसॉफ्टने अलीकडेच ही साधने सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. जेणेकरून संशोधन, डेटा शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील माहितीमध्ये बदल व सुधारणा करण्यासाठी सक्षम केले जाऊ शकते. या प्रकल्पातील मशीन लर्निग अल्गोरिदम तंत्रज्ञानाद्वारे शेतीचे सुपिकता वाढवणे, उत्पादन वाढ करणे, पिक पद्धती नियोजन करणे, पिकांचे आरोग्य उत्तम राखणे, गुणवत्ता वाढ करणे आणि त्या मागील खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते.

आर्थिक दुर्बल घटकांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा!

मायक्रोसॉफ्ट अझर या प्लॅटफॉर्मवर चालणारे फार्मव्हिब्स डॉट आय अल्गोरिदम, जमिनीतील सेन्सर्स, आकाशातील ड्रोन आणि अवकाशातील उपग्रह यांच्यामार्फत माहिती गोळा करून ‘भविष्यातील अत्याधूनिक शेती’ तयार करण्यासाठी जगभरातील विविध घटकाला सक्षम करू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी त्याच्या शेतात योग्य प्रमाणात खत पाणी व्यवस्थापन आणि तणनाशक वापरू शकतो. त्याच्या शेतातील तापमान, वाऱ्याच्या वेगाचा आणि पावसाचा अंदाज लावू शकतो. तसेच याद्वारे त्याच्या शेतीचे उत्पादन वाढवू शकतो. फार्म वाइब्जचा वापर करून, शेतकरी हवामानातील बदल आणि अन्नसुरक्षा यांसारख्या मोठ्या आव्हानांना पद्धतशीरपणे सामोरे जाऊ शकतो. विशेषत: फार्मव्हिब्स डॉट आय मध्ये खालील नाविण्यपुर्ण संशोधनाला चालना मिळणार आहे.

रिसर्च फॉर इंडस्ट्री नेटवर्किंग रिसर्च व्यवस्थापकीय संचालक आणि मायक्रोसॉफ्टचे अ‍ॅग्री फूडचे सीटीओ डॉ. रणवीर चंद्र यांनी या 7 नोव्हेंबर 2022 रोजी सहयोगाची अधिकृत घोषणा केली आहे. सदर घोषणे प्रसंगी ऑक्सफर्ड विद्यापीठचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लाऊड अँड एज इम्प्लिमेंटेशन कोर्स डायरेक्टर डॉ. अजित जावकर, मायक्रोसॉफ्टचे प्रिन्सिपल रिसर्च रियाझ पिशोरी यांच्या उपस्थितीत अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार आणि बारामती अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

One Comment on “बारामतीत मायक्रोसॉफ्ट उभारणार कृषि प्रकल्प”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *