बारामती, 20 ऑक्टोबरः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथील जिल्हा प्राथमिक शाळा नंबर 1 येथे नुकतीच 14 ऑक्टोबर 2023 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त वाचन-प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर बहुजन हक्क परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने व युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने याच्या नेतृत्वाखाली वडगाव निंबाळकर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी वाचन स्पर्धा व चित्रकला स्पर्धा शनिवार (दि.14) रोजी शालेय स्तरावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील गुणवत्त विद्यार्थी-विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मेडल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुनिल धिवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, पी.एस.आय कन्हेरे, पळशी गावचे युवा नेते माणिक काळे, वडगांव निंबाळकर गावचे उपसरपंच संगीता शहा, जादुगार शिवम माने, आप्पा भांडवलकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पट संख्या चांगली असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी बक्षिस समारंभ घेतल्याचे पाहून समाधान वाटले, असे सांगितले.
आरक्षणाची यैसी की तैसी!
तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे सुनिल धिवार यांनी सांगितले. शाळेतील मुले देशाचे भवितव्य असल्याने विद्यार्थ्यांच्या मध्ये महापुरुषांचे विचार पेरण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांमध्ये वाचनाचे आणि लिहिण्याची संस्कृती कमी होत चाललेली आहे आणि मोबाईलची संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढायला लागले आहे. एपीजे अब्दुल कलाम असे म्हणायचे की, ‘तुम्हाला जर उद्याचा महासत्ता बनवायचे असेल तर तुम्हाला लहान पिढी घडवली पाहिजे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक सुंदर शिक्षण दिलं पाहिजे, त्यामुळे उद्याचा नक्कीच भारताचा एक जबाबदार नागरिक होईल.’
बारामती तालुक्यातील आरोग्य व्यवस्था व्हेण्टिलेटरवर!
यावेळी माजी उपसरपंच संजय साळवे, पळशीचे उपसरपंच मयुरी गुलदगड, होळ गावच्या सरपंच छाया भंडलकर, वाकी गावचे सरपंच किसन बोडरे, ग्रामपंचायत सदस्या सारिखा खोमणे, सदस्य राहूल आगम, पिंटू किर्वे, आण्णा भोसले, दत्तात्रय खोमणे, सूरज खोमणे, शिवाजी खोमणे, सूर्यकांत बोडरे, अलका भंडलकर, ऊर्मिला मदने, लालासो खोमणे, नंदिनी मदने, सुनिता घळगे आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
याकामी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी जाधव, राहुल जाधव आणि मुख्याध्यापिका कविता जाधव, अरुणा आगम यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल गवळी सरांनी तर स्वागत जिल्हाध्यक्ष संतोष डुबल यांनी केले तर आभार युवक अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने, अमोल गायकवाड, अनिल कदम, पांडुरंग घळगे, नंदकुमार जाधव, राहुल जाधव, पुष्कराज गायकवाड, लालासो आगम, लखन पवार, आदित्य चव्हाण, परशुराम पाचर्णे, सचिन कुंभार व बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते.
One Comment on “वाचन- प्रेरणा दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!”