बारामती, 18 सप्टेंबरः जस जसे लोकसभा 2024 ची निवडणूक जवळ येत आहेत, तस तसे बारामतीसह राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सध्या केंद्राने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदार संघावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. खास बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे त्या या महिन्यात बारामती दौऱ्यावर येत आहेत.
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती लोकसभा दौऱ्यासंदर्भात बारामतीमधील भाजप कार्यालयात आज, 18 सप्टेंबर 2022 रोजी आमदार राम शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सदर बैठकीत राम शिंदे यांनी निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याच्या नियोजन संदर्भात आढावा घेतला.
यावेळी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सुनिल कर्जतकर, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, पाडुरंग कचरे, सतिश फाळके, रंजन तावरे, अक्षय गायकवाड, सचिन साबळे, गोविंद देवकाते, प्रमोद डिंबळे, प्रमोद खराडे, भारत देवकाते, नितीन थोरात, जगदीश कोळेकर, रघु चौधर, पोपट खैरे, युवराज तावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.