इंदापूर, 1 जुलैः इंदापूरचे आमदार तथा राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (मामा) यांना मातृशोक झाले आहे. दत्तात्रेय भरणे यांच्या आई गिरीजीबाई विठोबा भरणे यांचे आज (1 जुलै) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गिरीजाबाई भरणे यांनी 83 वर्षी शेवटचा श्वास घेतला. जिजी या नावाने त्या परिचित होत्या.
दुःखद वार्ता…
आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की,आमच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे. आज दुपारी २ वा. भरणेवाडी येथे अंत्यविधी होणार आहे. लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक सुख दुःखात यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेल्या आईचा आधार आज हरपला आहे. pic.twitter.com/DvblY8OtBD— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) July 1, 2022
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गिरिजाबाई (जिजी) या आजारी होत्या. त्यांनी आज सकाळी शेवटचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. दत्तात्रेय भरणे यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर आज, दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.