बारामती, 25 ऑक्टोबरः बारामती एमआयडीसी येथील शासकीय महिला रुग्णालयातील साहित्यांवर चोरांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. या महिला रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटशी संबंधित विविध प्रकारचे सुमारे 78 हजार रुपयांचे साहित्य अज्ञाताने चोरून नेले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात रुग्णालयातील भौतिक उपचारतज्ज्ञ डॉ. दिनेश वानखेडे यांनी फिर्याद दिली.
दरम्यान, महिला रुग्णालयात 20 ऑक्टोबर 2022 रोजी हा प्रकार उघडकीस आला. महिला रुग्णालय परिसरात वानखेडे हे नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना त्यांना ऑक्सिजन प्लांटचा लोखंडी जाळीचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी पाहणी केली असता ऑक्सिजन प्लांटमध्ये जोडलेला ऑक्सिजन मीटर, त्याला जोडलेला पाइप, 36 नॉन रिटर्न वॉल दिसले नाहीत. त्यांनी तत्काळ वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांना ही बाब सांगितली. चोरीला गेलेल्यामालाची माहिती घेत पोलिसांत फिर्याद दिली.
One Comment on “बारामती महिला रुग्णालयात साहित्यांची चोरीला”