बाबुर्डी येथे वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान! शरयू फाउंडेशनच्या वतीने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदत

बारामती, 15 मे: (विश्वजीत खाटमोडे) बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथे शनिवारी (दि.11) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बाबुर्डी गावातील अनेक घरांचे नुकसान झाले. हा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गावातील गुरांचे गोटे, विजेचे खांब, झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच गावातील काही जणांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेले आहेत. यासोबतच गावातील अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी नुकतीच बाबुर्डी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी याठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

https://twitter.com/MahavikasAghad3/status/1790431534941389152?s=19



युगेंद्र पवार यांनी काल बाबुर्डी गावातील नुकसानीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी यावेळी नुकसानग्रस्त कुटुंबीयांना शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू साहित्य मदत म्हणून दिले. यासोबतच शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बाबुर्डी गावातील नुकसानग्रस्त घरांची कामेही सुरू करण्यात आली. यावेळी युगेंद्र पवार यांनी या कामांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष श्री एस एन बापू जगताप, आर डी काटे, सचिन लडकत, हनुमंत चांदगुडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *