गुजरात/सूरत, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) गुजरातमधील सूरतमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कुटुंबाने सामूहिक विष प्राशन करून आत्महत्या केल्याने 7 जणांचा मृत्यू झाला. ही घटना सुरतच्या अडाजन भागातील पालनपूर पाटिया परिसरात घडली. दरम्यान, आत्महत्या केलेल्या या कुटुंबातील कर्ता पुरुष हा फर्निचर व्यवसायाशी संबंधित होता. त्याने आपले आई-वडील, पत्नी आणि तीन लहान मुलांना विष दिले आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून घेत आत्महत्या केली.
शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर!
मात्र, या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे या परिसरात सध्या घबराटीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी विष प्राशन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्यांनी लोकांना उसने पैसे दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर या लोकांनी ते पैसे परत दिले नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
तत्पूर्वी, आत्महत्या करणारे मनीष सोलंकी यांचा फर्निचरचा व्यवसाय होता. त्यांना आज (दि.28) सकाळी दुकानातील कर्मचाऱ्यांनी फोन केला होता. मात्र त्यांनी फोनला कोणताच प्रतिसाद दिला नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी सोलंकी यांचे घर गाठले. दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी घराची खिडकी तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना या कुटुंबाच्या आत्महत्येची माहिती मिळाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तसेच त्यामुळे या कुटुंबाने त्यांनी राहत असलेला फ्लॅट विकण्यासाठी काढला असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर या कुटुंबाने आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली असावी, असे तेथील लोकांनी म्हटले आहे.
‘मी पुन्हा येईन’ च्या व्हिडिओवर फडणवीसांचे स्पष्टीकरण
One Comment on “एका कुटुंबातील 7 जणांची सामूहिक आत्महत्या”