बारामती, 24 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील धनगर समाजाचे आराध्यदैवत श्री नायकोबा देवाची जत्रा शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 रोजीपासून सुरु होत आहे. आज, गुरुवारी, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी देवाची धार्मिक पूजाअर्चा, अभिषेक, गोड नैवेद्य, आरती; तर सायंकाळी गुलाल उधळीत ढोल लेझीम, गजीनृत्य, छविना होणार आहे.
देवाच्या मुख्य जत्रेचा उद्या शुक्रवारी, 25 नोव्हेंबर हा दिवस आहे. त्या दिवशी पहाटे पूजाअर्चा, अभिषेक, आरती व त्यानंतर जत्रेला सुरुवात होईल. ही यात्रा रात्री उशिरापर्यंत सुरूच असते. तसेच शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजेनंतर कुस्ती दंगलीचा कार्यक्रम होणार आहे.
श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी, ग्रामपंचायत मासाळवाडी व वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांच्या वतीने भाविकांना सोयीसुविधेसह इतर सहकार्य केले जाते. श्री नायकोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असून, राज्याच्या विविध भागांतून भाविक दर वर्षी याठिकाणी येत असतात.
One Comment on “मासाळवाडीची मुख्य जत्रा उद्यापासून”