बारामती, 30 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी गावाचा बाजार लिलाव तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा जाहीर करण्यात आला. सदर बाजार लिलाव हा कोरोना काळामुळे जाहीर झाला नव्हता. सदर लिलावाची रक्कम 5 हजार रुपये अनामत ठेवली होती.
राजुरीत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त कुस्तीचे आयोजन
लिलावाची बोली 80 हजारांपासून सुरूवात करून शेवट 2 लाख 45 हजारापर्यंतची बोली झाली. बाजार लिलाव घेण्यासाठी 7 ते 8 जणांनी ग्रामपंचायतची अनामत रक्कम भरून लिलावामध्ये प्रत्यक्षात सहभाग घेतला होता. यात भाजपचे तालुका सरचिटणीस बाळासाहेब बालगुडे यांनी देखील प्रत्यक्ष सहभाग घेऊन ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
श्री छत्रपती विद्यालयात सेवानिवृत्तीपर विशेष कार्यक्रम संपन्न
या पुर्वी लिलाव राहुल राजपुरे यांनी घेतला होता. त्यांनी लिलावाचे काम अगदी प्रामाणिकपणे सांभाळले होते, असे देखील ग्रामस्थांनी म्हटले आहे. सर्वात जास्त रक्कम लावून बाळासाहेब श्रीरंग बालगुडे यांनी हा लिलाव घेतला. लिलावाचे काम ग्रामसेवक लव्हटे भाऊसाहेब यांनी पाहिले. यावेळी सरपंच मंगल खोमणे, उपसरपंच किरण जगदाळे यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
2 Comments on “मुर्टीचा बाजार लिलाव पुन्हा जाहीर”