तब्बल अडीच वर्षांनी मरीमाता देवीची साथ उत्साहात साजरी

बारामती, 16 जुलैः बारामती तालुक्यातील मोढवे येथील मरीमाता देवीच्या यात्रा उत्साहात पार पडली. गेली अडीच वर्षे कोरोनामुळे आखाडी साथ झाली नव्हती. कोरोना संपला की ही यात्रा शांततेत आणि ढोल ताशाच्या आवाजात पार पडली. या यात्रेसाठी हजारांहून अधिक भक्तगण आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी येथील वैद्यकीय अधिकारी व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन दुरक्षेत्र करंजेपूल पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी देखील उपस्थित होते.