माळेगावात ताडी विक्री विरोधात मोर्चा

बारामती, 3 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील माळेगाव येथे संतप्त ग्रामस्थांनी अवैध धंद्यांविरोधात 2 नोव्हेंबर 2022 रोजी मोर्चा काढण्यात आला. तसेच विषारी ताडी विक्री प्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान उत्पादन शुल्क विभागाचा एक ही जबाबदार पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने मोर्चेकऱ्यांनी नाराजी व्यक्त करुन निषेध व्यक्त केला.

बारामती प्रशासनातील सेक्स दलाल!

दरम्यान, 30 ऑक्टोबर रोजी दोन सख्ख्या चुलत भावांचा विषारी ताडी पिल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तीन आरोपींना अटक केली होती. यामुळे तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन निषेध मोर्चा काढला होता. माळेगाव नगरपंचायत ते पोलीस ठाणे असा निषेध मोर्चा काढला होता. यावेळी दारु बंद झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या जात होत्या.

मोर्चामध्ये पोलिस ठाण्यासमोर मच्छिंद्र टिंगरे, विक्रम कोकरे, आवुराजे भोसले, अशोक सस्ते उदय चावरे, रामभाऊ वाघमोडे, विश्वास मांढरे, प्रशांत वाघमोडे, कल्पना माने, अंजु वाघमारे, आशा नवले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाचा स्विकार तालुका पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी केला. यावेळी माळेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

बारामतीत न्यायालयीन बंदींना कायदेविषयक अधिकाराबाबत मार्गदर्शन

दारुमुळे लहानपणी माझे वडिल वारले, जमिन विकली. यामुळे मी पोरका झालो, असे म्हणुन आवुराजे भोसले तर तिन दिवसांपूर्वी दारुच्या अतिसेवनामुळे रफिक डांगे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आई नजमा डांगे यांनी अश्रुंना वाट मोकळी करताच अनेकांचे डोळे पाणावले.

माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करणार असून चोरुन धंदे करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले.

One Comment on “माळेगावात ताडी विक्री विरोधात मोर्चा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *