मराठा आरक्षणाला क्युरेटिव्ह पिटीशनचा फायदा होणार नाही – गुणरत्न सदावर्ते

मुंबई, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केले आहे. या क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राज्य सरकारच्या विरोधात वकील जयश्री पाटील या युक्तीवाद करणार आहेत. तर जयश्री पाटील या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. या क्युरेटिव्ह पिटीशन याचिकेवर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण संदर्भात या क्युरेटिव्ह पिटीशनचा काहीच फायदा होणार नसल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.



“मराठा आरक्षणासाठी न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनचा काही फायदा होणार नाही. मराठा समाजाला मागास मानले जाणार नाही असे सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच म्हटले आहे. त्यामुळे क्युरेटिव्ह पिटीशनमधून नवीन काहीचं साध्य होणार नाही, हे मी एकदम खात्रीपूर्वक सांगू शकतो. सरकार कोणाचे देखील असो, आजच्या घडीला राज्य सरकार या बाबतीत कायदा करू शकत नाही. तसेच सुप्रीम कोर्टात आज 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा वाढवली जाणार नाही,” असे सदावर्ते यांनी म्हटले आहे. त्यामुळे आजचा दिवस मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात येईल, फडणवीसांची अपेक्षा

तसेच, “सुप्रीम कोर्टात आज आरक्षणाच्या संदर्भात काही मोठी गोष्ट घडेल, असे मला वाटत नाही. ही सुनावणी इन चेंबर होणार आहे. मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारला हिवाळी अधिवेशनात कोणताही निर्णय घेता येणार नाही, कारण हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.” अशा शब्दांत गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर या सुनावणीकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला निधीची कमतरता भासणार नाही – अजित पवार

तत्पूर्वी, राज्य सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये रद्द केले होते. तेंव्हा राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करता आले नव्हते. त्यानंतर आता आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला कआहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. जरांगे पाटील यांनी त्यांचे हे उपोषण सोडताना राज्य सरकारला मराठा आरक्षण लागू करण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने 13 ऑक्टोंबर रोजी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केले होते. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

One Comment on “मराठा आरक्षणाला क्युरेटिव्ह पिटीशनचा फायदा होणार नाही – गुणरत्न सदावर्ते”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *