नागपूर, 30 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिले आहे. याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. मराठा आरक्षण या विषयावर आपले सरकार अतिशय गंभीर असून पूर्ण प्रयत्न करीत आहे, असा शब्द त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिला आहे. या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले आहे की, “मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे भेट घेतली. यावेळी उपस्थित प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारले तसेच आरक्षणासंदर्भात आणि इतर विषयांबाबत चर्चा झाली. मराठा आरक्षण या विषयावर आपले सरकार अतिशय गंभीर असून पूर्ण प्रयत्न करीत आहे, अशी खात्री ही यावेळी उपस्थित बांधवांना दिली.”
मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या – जरांगे पाटील
तत्पूर्वी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोंबर पासून आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज (दि.30) सहावा दिवस आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत सध्या ढासळत चालली आहे. मात्र, त्यांनी यावेळी कोणतेही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षणासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने सध्या करण्यात येत आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत एकदाचं चर्चेला तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे नेते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केरळमध्ये ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात 3 स्फोट
तर दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील अनेक गावांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे. तसेच या गावांत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना येऊ दिले जात नाही. या पार्श्वभूमीवर, राज्यातील अनेक नेत्यांचे गावभेटीचे दौरे रद्द झाले आहेत. सोबतच अनेक गावांत सध्या विविध प्रकारचे आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज हा सध्या आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
One Comment on “मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचे फडणवीसांना निवेदन”