पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी केले मतदारांना आवाहन

दिल्ली, 01 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सातव्या टप्प्यात देशातील 7 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील एकूण 57 जागांवर मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा आज शेवटचा टप्पा आहे. त्यानंतर येत्या 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विट करून सातव्या टप्प्यातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1796716186752995479?s=19

नरेंद्र मोदींचे आवाहन

“लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. मी या टप्प्यातील सर्व मतदारांना लोकशाहीच्या या महान उत्सवात उत्साहाने सहभागी होण्याची विनंती करतो. मला विश्वास आहे की आमचे तरूण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने पुढे येऊन मतदान करतील. आपण मिळून आपली लोकशाही अधिक चैतन्यशील बनवूया,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1796733103031079210?s=19

राहुल गांधी काय म्हणाले?

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, “प्रिय देशवासियांनो! आज मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा असून आत्तापर्यंतच्या ट्रेंडवरून भारतात सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मला अभिमान आहे की, कडक उन्हातही तुम्ही सर्वजण लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी मतदानासाठी बाहेर पडलात. आजही मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि दंभ आणि अत्याचाराचे प्रतिक बनलेल्या या सरकारला आपल्या मताने अंतिम झटका द्या. 4 जूनचा सूर्य देशात नवी पहाट घेऊन येणार आहे.”

https://twitter.com/JPNadda/status/1796722296817611149?s=19

जेपी नड्डा यांचे आवाहन

याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील ट्विट करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. “मी लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्व मतदारांना, विशेषतः माता, भगिनी आणि तरूणांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. तुमचे प्रत्येक मत एक मजबूत, समृद्ध आणि स्वावलंबी राष्ट्र निर्माण करण्याचा आमचा संकल्प मजबूत करेल आणि विकसित भारताच्या उभारणीच्या मार्गावर आम्हाला अधिक वेग देईल. यामुळे देशाच्या अविश्वसनीय वारशाचा पुनर्विकास आणि लोकांची सर्वांगीण उन्नती सुनिश्चित होईल. लोकशाहीप्रती आपली सर्वोच्च जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडा, नक्कीच मतदान करा.” असे ट्विट जेपी नड्डा यांनी केले आहे.

https://twitter.com/AmitShah/status/1796726326617145810?s=19

अमित शाह यांचे ट्विट

“मी सर्व मतदारांना लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अभूतपूर्व मतदान करण्याचे आवाहन करतो. देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी पुन्हा मजबूत सरकार निवडणे आवश्यक आहे. असे सरकार बनवा जे देशाला स्वावलंबी बनवण्यासोबतच प्रत्येक देशवासीयामध्ये आत्मविश्वास जागृत करेल. विकसित भारतासाठी उत्साहाने मतदान करूया आणि इतरांनाही प्रेरणा देऊ या,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1796745475649118463?s=19

केजरीवाल काय म्हणाले?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लोकांना आज मतदान करण्याचे आवाहन केले आहे. “लोकशाहीच्या या महान पर्वात आज शेवटच्या टप्प्यात देशात मतदान होणार आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आपला मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणात बजावावा. तुम्ही स्वतः मतदान करा आणि तुमच्या शेजारच्या लोकांना सोबत घ्या. हुकूमशाही हरेल, लोकशाही जिंकेल.” असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

https://twitter.com/priyankagandhi/status/1796736639483678821?s=19

प्रियांका गांधी यांचे ट्विट

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी याबाबत ट्विट करून म्हटले की, प्रिय बहिणींनो, प्रिय बंधूंनो! आज निवडणुकीचा शेवटचा टप्पा असून तोपर्यंत भारतात सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तुमचा मोठा सहभाग भारताला मजबूत करेल. तुमच्या अनुभवाच्या आधारे, तुमच्या विवेकबुद्धीनुसार, तुमच्या मुद्द्यांवर जबरदस्त मत द्या. तुमच्या संविधानाला, तुमच्या लोकशाहीला मत द्या आणि फक्त तुमच्यासाठी काम करणारे सरकार बनवा.” अशा प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *