मनोज जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

धाराशिव, 15 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना गेल्या रविवारी (दि.12) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर जरांगे पाटील यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात ते सभेच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाला संबोधित करणार आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील हे यावेळी मराठा समाजाच्या लोकांना भेटणार आहेत. त्यांचा हा महाराष्ट्र दौरा 23 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यांत पाऊस आला तर काय होणार? आयसीसीने सांगितले

यामध्ये मनोज जरांगे पाटील हे आज सर्वप्रथम धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यातील पहिली सभा धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे जगदाळे मामा हायस्कूलच्या मैदानावर पार पडणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांची भूम तालुक्यातील ईट या गावात दुपारी 2 वाजता सभा होणार आहे. त्यानंतर त्यांची दुपारी 4.30 वाजता परांडा गावात सभा पार पडणार आहे. ही सभा परांडा पंचायत समितीच्या पाठीमागील मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या सभांच्या माध्यमातून ते मराठा समाजातील लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. या सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभांना मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार येणार नाहीत? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या 10 दिवसांच्या या महाराष्ट्र दौऱ्यात 9 जिल्ह्यांमध्ये एकूण 24 सभा होणार आहेत. 23 नोव्हेंबर पर्यंत त्यांचा हा महाराष्ट्र दौरा असणार आहे. तर राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यासाठी जरांगे पाटील यांना 24 डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून ओबीसी समाजाचे नेते हे मराठा आरक्षणाला विरोध करताना दिसत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी या नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या सभेत याविषयी काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

One Comment on “मनोज जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *