मनोज जरांगे पाटलांचा अखेर विजय! सरकारकडून सर्व मागण्या मान्य, उपोषण सोडणार

नवी मुंबई, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली आहे. राज्य सरकारने आता मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यासंदर्भातील आदेश राज्य सरकारने मध्यरात्रीच काढला आहे. त्याची प्रत जरांगे पाटलांना देण्यात आली आहे. यामध्ये त्यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा बांधव आज सकाळपासूनच आनंद व्यक्त करीत आहेत. तसेच आता मनोज जरांगे पाटील हे त्यांचे उपोषण मागे घेणार आहेत.

https://x.com/ANI/status/1751082948609314987?s=20

https://x.com/ANI/status/1751058132930002964?s=20

जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या

तत्पूर्वी, नोंदी असलेल्या नात्यातील सर्व सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरागे पाटील यांनी केली होती. या मागणीवर जरागे पाटील आणि राज्य सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात बरीच चर्चा झाली. त्यानंतर अखेर सरकारने त्यांची ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता सगेसोयऱ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. राज्यभरात कुणबीच्या 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटले आहे. या 37 लाख लोकांचा डेटा सरकारकडून मिळणार असल्याचे जरागे पाटील म्हणाले. सोबतच राज्य सरकारने अंतरवाली सराटी सह संपुर्ण राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मान्य केले आहे. तसेच आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे, ही मागणी देखील मान्य झाली. यासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आता त्यांचे उपोषण मागे घेणार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1751013602918887886?s=19

मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार

मुख्यमंत्री महाराष्ट्र शिंदे हे थोड्याच वेळात वाशी येथे पोहोचणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन जरांगे पाटील हे त्यांचे उपोषण सोडणार आहेत. त्यानंतर वशी येथे जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. तत्पूर्वी, काल मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. सरकारकडून आमची विनंती मान्य करण्यात आली आहे. आम्ही त्यांचे पत्र स्वीकारू. मी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडेन,” असे जरांगे पाटील म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *