दिल्ली, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (दि.26) रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.28) दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी नेण्यात आले. शुक्रवारी (दि.27) दिवसभर त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
https://x.com/ANI/status/1872650677467697286?t=sbg842w-tsszO90iVd8AJQ&s=19
https://x.com/ANI/status/1872855050663673937?t=TIA22k3QUhvAoWN1qc7TwQ&s=19
मनमोहन सिंग यांचे पार्थिव आज (दि.28) सकाळी काँग्रेस मुख्यालयात नेण्यात आले. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतः मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस कार्यालयात घेऊन गेले. काँग्रेस मुख्यालयात अनेक नेते आणि सेलिब्रिटी यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर काँग्रेस मुख्यालयातून त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. काही वेळातच त्यांचे पार्थिव निगमबोध घाटावर पोहोचले, जिथे शासकीय इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
https://x.com/ANI/status/1872873012615364671?t=idtN2XamoqQsQy9cEcO2nA&s=19
पीएम मोदी उपस्थित राहणार
मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, तसेच काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली असून, त्यांचे योगदान आणि शांत नेतृत्व कायम स्मरणात राहील.