या सत्संग सोहळ्यास बारामतीसह इंदापूर तालुक्यातील निरंकारी अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी बारामती शाखेचे संचालक शशिकांत सकट यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. काटेवाडी येथे गेली चार ते पाच वर्षपासून निरंकारी मिशनचा साप्ताहिक सत्संग सुरू होता. परंतू मध्यंतरी कोरोनामुळे अडीच ते तीन वर्षे याठिकाणी सत्संग होऊ शकला नाही. त्यामुळे येथील निरंकारी अनुयायी या सत्संगापासून वंचित झाली होती. येथील स्थानिकांना या सत्संगचा लाभ मिळावा, म्हणून या सत्संगाची सुरुवात महादेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आली.
याबाबतची माहिती येथील निरंकारी मिशनचे प्रचारक आनंद भिसे यांनी दिली. तसेच या ठिकाणी दर शुक्रवारी सायंकाळी 7 ते 9 यावेळेत सत्संग होणार असल्याने भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही भिसे यांनी केले. उपस्थितांचे आभार भिसे यांनी मानले तर मंच संचालन बाळासाहेब जानकर यांनी केले.