बारामती, 18 ऑक्टोंबर: (प्रतिनिधी – अनिकेत कांबळे) बारामती येथील चिराग गार्डन येथे 12 ऑक्टोंबर 2024 रोजी मल्हार दांडिया फेस्टिवल खूप मोठ्या उत्साहात पार पडली. या दांडियाला वेगवेगळ्या स्तरातून तरूण तरूणी व मोठा युवक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सुभाष सोमानी, सचिन सातव, आनिता गायकवाड, ज्योती जाधव, अर्चना सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
गेले पाच वर्षे झालं या दांडिया महोत्सवाचं आयोजन केलं जातं व आयोजनाला युवकांचा व युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. यामध्ये गरबा या नृत्याच्या स्पर्धा घेतल्या जातात यावर्षीच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संस्कृती दांडिया ग्रुप फलटण यांनी पटकावले. तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हनुमान नगर गरबा ग्रुप यांना मिळाले व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शिवनगर बारामती या ग्रुपला मिळाले. यामुळे सर्व बारामती मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.