उन्हाळ्यात शरीरावरील मळाची समस्या ही प्रत्येकालाच उद्भवते. मळाची समस्या ही उन्हात फिरणाऱ्यांना जाणवते आणि सावलीत असणाऱ्यांनाही जाणवते. वाढलेल्या तापमानामुळे सावलीतही शरीरावर मळ जमा होतो. गरम हवा आणि तापमान हे या मागील कारण आहे. शरीरावर जमा होणाऱ्या मळापासून सुटका करण्यासाठी महागड्या स्क्रब वापरणे, प्रत्येकाला परवडणारे नाही. जर तुम्हाला मळापासून सुटका करायची असेल तर तुम्ही घरीच स्क्रब बनवून तुमची त्वचा सुंदर, मुलायम आणि चमकदार बनवू शकता. हे स्क्रब वापरून तुम्ही त्वेचवर जमा होणाऱ्या मळाचा काळपटपणा दूर करू शकता. तसेच या स्क्रबमुळे तुमच्या त्वचेवरील मृत त्वचेपासून सुटका होते. यामुळे तुमची त्वचा सुंदर, तजेलदार आणि मुलायम बनते.
- कॉफी स्क्रबः एका वाटीमध्ये कॉफी पावडर आणि नारळाचं तेल मिसळून स्क्रब तयार करा. आता हे स्क्रब त्वचेवर मळ झालेल्या ठिकाणी लावा. स्क्रब केल्यानंतर 10 मिनिटे त्वचेवर तसेच राहू द्या. त्यानंतर स्क्रब थंड पाण्याने धुवा. हे स्क्रब तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा आणि मळ दूर करण्यास मदत करेल.
- बडीशेप स्क्रबः बडीशेप घेऊन ती मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे मिश्रण एका बरणीत भरून ठेवा. एक चम्मच वाटलेली बडीशेप घ्या. यामध्ये एक चमचा मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिसळा. याची पेस्ट तयार करुन घ्या. हे स्क्रब चेहऱ्यावर किंवा मळ झालेल्या त्वचेवर लावा. 15 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा. या स्क्रबने तुमच्या त्वचेवरील मळ दूर होईल. तुमची त्वचा सुंदर, चमकदार आणि मुलायम होईल.
- बेसण स्क्रबः बेसणामध्ये मोहरीचं किंवा बदाम तेल, गुलाब पाणी आणि चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचेवर स्क्रबप्रमाणे वापरा. त्यानंतर 15 मिनिटांसाठी तशीच राहू द्या. या नंतर पुन्हा स्क्रब स्वच्छ पाण्याने धुवा. या स्क्रबमुळे त्वचेवर मळ दूर होतो.