सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रविवारी बारामती मतदारसंघात तीन ठिकाणी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा

बारामती, 27 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीतील बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.28) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तीन ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामती मतदारसंघातील शिर्सूफळ येथे उद्या सकाळी 10:30 वाजता महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता बारामती येथील नटराज नाट्य कलामंदिर याठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर बारामती तालुक्यातील सांगवी येथे सायंकाळी 6 वाजता महायुतीच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.



या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत. यावेळी हे नेते आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यांना बारामती तालुका व शहरातील महायुतीचे नेते, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *