जिल्ह्यात वीज चोरांविरोधात महावितरण आक्रमक

पुणे, 19 नोव्हेंबरः वीजचोरी करणाऱ्या विरोधात महावितरणने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या एका आठवड्यात कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर परिक्षेत्रातील विविध ठिकाणी घातलेल्या धाडीत तब्बल 198 वीज चोरांना दणका दिला आहे. सदर कारवाईत तब्बल 2 कोटी 50 लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात यश आले आहे. यात एकट्या ठाणे शहरात सर्वाधिक 10 वीज चोऱ्या सापडल्या आहेत.


मोठ्या प्रमाणात विजेचा वापरूनही वीज ग्राहकास कमी रकमेचे देयक कसे जाते, अशा ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते. मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करून येणाऱ्या मोठ्या रकमेचे देयक टाळण्यासाठी वीज चोरांनी त्यांच्याकडील मीटरमध्ये फेरफार केली असावी, असा संशय आल्याने महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने मीटरची तपासणी करण्यासाठी विविध पथके तयार केली. या पथकांनी नागपूर, औरंगाबाद, पुणे व कोंकण परिक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहे. या कारवाईत जास्त वीज वापर असलेल्या मात्र कमी वीजबिल येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीज चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.

पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर ‘माफीवीर’चे बॅनर

या सर्व मीटरची तपासणी केली असता जवळपास सर्वच वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. हे सर्व मीटर जप्त करून त्याची प्रयोग शाळेत तपासणी केली असता तब्बल 198 वीजग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळले. एकट्या कोंकण परिक्षेत्रातील वीजचोरीचे मुल्याकंन केले असून येथील वीजग्राहकांनी एकूण 7 लाख 44 हजार 114 युनिटचा अनधिकृतपणे वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. या वीजचोरीची अनुमानित रक्कम 1 कोटी 22 लाख रुपये आहे. या ग्राहकांना वीजचोरीचे देयक देण्यात आले आहे. उर्वरित पुणे, ओरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रात पकडलेल्या वीज चोरीच्या मुल्यांकनांची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे.

सुरक्षा आणि अंमलबाजवणीच्या कार्यकारी संचालिका स्वाती व्यवहारे, भरारी पथकातील कल्याण व पुणे परिक्षेत्राचे (सुवअं) उपसंचालक सुमित कुमार, नागपूर परिक्षेत्राचे (सुवअं) उपसंचालक सुनील थापेकर, औरंगाबाद परिक्षेत्राचे (सुवअं) उपसंचालक सतीश कापडणी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय पाटील, विजय सिंग, विदुयतकुमार पवार, धनंजय सातपुते यांनी सदर वीजचोरी मोहीम यशस्वी करण्यात मोठी भूमिका पार पाडली.

बारामती ते मुंबई रेल्वे सेवा लवकरच सुरु होणार?

One Comment on “जिल्ह्यात वीज चोरांविरोधात महावितरण आक्रमक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *