वालचंदनगर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उद्घाटन संपन्न

वालचंदनगर, 29 जून: (विश्वजीत खाटमोडे) इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख संजय सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, संजय सोनवणे यांची जिप्सी गाडीतून संपूर्ण वालचंदनगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली.



त्यानंतर संजय सोनवणे यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी वालचंदनगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते बस स्टॅन्ड या मार्गावर त्यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीनंतर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे संजय सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख संजय सोनवणे आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अंगावर जेसीपीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत सन्मान करण्यात आले.



या कार्यक्रमानंतर वालचंदनगर बस स्टॅन्ड ते सभेच्या ठिकाणापर्यंत पक्षाची पदयात्रा काढण्यात आली. यावेळी संजय सोनवणे यांनी सभेच्या माध्यमातून उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष वाढीसाठी काम करण्यात येणार असल्याचे संजय सोनवणे यांनी यावेळी सांगितले. या सभेला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *